रेणुका माता मल्टीस्टेटच्या पहिल्या शेवगाव शाखेचा 21 वर्धापन दिन उत्साहात साजरा
शेवगाव, दि, २९( प्रतिनिधी )
**वर्धापन दिनानिमित्त भक्ती बाबत नवचंडीयाग संपन्न**
. व्यवसायाला आलेल्या ज्या इंग्लंडच्या व्यापाऱ्यांनी भारतावर तब्बल दिडशे वर्षे अधिराज्य केले .त्याच देशाच्या राजधानीच्या पार्लमेंट हाऊस मध्ये गेस्ट ऑफ ऑनरच्या सन्मानासह तेथील नव उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी जगभरातून निवडलेल्या २५ उद्योजकामध्ये ज्या भारतीयांचा समावेश होता ., त्या ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत चंद्रकांत भालेराव यांच्या विश्वविख्यात व पारदर्शक संस्थेचे, श्री रेणुका मल्टीस्टेटचे आपण खातेदार आहोत याचा सार्थ अभिमान आपण बाळगायला हवा .अशा शब्दात तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांनी श्री रेणुका मल्टीस्टेट संस्थेचा गौरव केला .
आपल्या सचोटीच्या व्यवहाराने असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादन करत देशातील ९ राज्यात तब्बल १४० शाखाचा पसारा, अकरा लाखांवर खातेदार असलेल्या, श्री रेणुका माता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या शेवगाव येथील .पहिल्या शाखेचा २१ वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत प.पु .आदिनाथ महाराज शास्त्री यांचे अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला .यावेळी ते बोलत होते .
यावेळी ज्येष्ठ नेते अरुण पाटील लांडे ., पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके,विष्णुपंत भालेराव,भाजपाचे प्रदेश सचिव अरुण मुंढे, रांजणीचे सरपंच काकासाहेब घुले, विजय पोटफोडे, डॉ. अरविंद पोटफोडे,बाळासाहेब चौधरी,एकनाथ कुसळकर, हरीश भारदे ,अशोक आहुजा,गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ, पत्रकार रावसाहेब मरकड, दादा डोंगरे,रामनाय रुईकर, अविनाश देशमुख , अलिम शेख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे , कृष्णा महाराज मुळीक , तसेच विविध पक्षाचे, संस्थाचे प्रतिनिधी, असंख्य खातेदार व ठेवीदार यांनी या सोहळ्यास उपस्थिती लावून डॉ . प्रशांत नाना भालेराव यांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्यानिमित्त सार्थक देवा यांनी दोन दिवस नवचंडी याग करुन पौरहित्य केले ,
अॅड. नितीन भालेराव , अश्वलिंग जगनाडे, राजेंद्र नांगरे, श्रीमंत घुले, प्रा जनार्दन लांडे पाटील यांनी संस्थेच्या वतीने सर्वांना शाल, पुष्प गुच्छ ‘देऊन स्वागत केले . यावेळी रेणुका भक्तानुरागी मंगलताई भालेराव व जयंती भालेराव याही उपस्थित होत्या .
.