शेवगाव – जनार्दन लांडे सर याच कडून
समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव असेल, तर सुविधा आणि सौंदर्य यांची सांगड घालणारे कार्य घडते — याचे उत्तम उदाहरण ठरले आहे श्री रेणुका माता फाउंडेशनकडून अमरापूरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्काराच्या ठिकाणी सुविधा आणि सुरू असलेले सुशोभीकरण!
श्री रेणुका माता मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या CSR फंडातून चालू असलेल्या या प्रकल्पामुळे गावकऱ्यांची वर्षानुवर्षांची गैरसोय दूर होऊन चांगल्या पूर्णत्वाकडे जात आहे. पावसात चिखल, खड्डे आणि असुविधा यामुळे अखेरचा निरोप देणे देखील त्रासदायक ठरत होता. ही वेदना ओळखून डॉ. प्रशांत नाना भालेराव यांनी आपल्या पिताश्री कै. चंद्रकांत दादा भालेराव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे काम हाती घेतले. या कामाचा शुभारंभ रेणुका भक्त मंगल ताई चंद्रकांत भालेराव यांच्या हस्ते करण्यात आला
आज या ठिकाणी रस्ता सपाटीकरण,नवीन पत्रे असलेले शेड,रंगीत पेव्हिंग ब्लॉक्स,बसण्यासाठी सुंदर बाके, अमरधाम परिसरामध्ये विविध सुंदर फुलझाडे व शोभेची सावली देणारे वृक्ष झाडे लावली जाणार आहेत तसेच लवकरच उभारली जाणारी “कै. चंद्रकांत दादा वैकुंठधाम” अशी कमान — या सगळ्यामुळे स्मशानभूमी ही आता केवळ शेवटचे स्थान न राहता, शांत, स्वच्छ आणि सन्मानदायक वातावरणाचे प्रतीक बनत आहे.
“हे केवळ काम नाही, तर खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली आहे… आणि खऱ्या अर्थाने समाजसेवेचा आदर्श आहे!”
रेणुका माता फाउंडेशन ने दाखवलेल्या या सामाजिक जाणिवेचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत असून, अन्य संस्थांनीही अशा कार्यातून प्रेरणा घ्यावी, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.