spot_img
spot_img
HomeUncategorizedसंस्कृती संस्कार व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराला स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांची भेट

संस्कृती संस्कार व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराला स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांची भेट

13 ते 25 वयोगटातील मुलीं साठी आयोजित शिबिरातील राबवण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणाचे केले स्वामीजींनी कौतुक

नेवासा प्रतिनिधी

आज नेवासा फाटा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठान आयोजित व परमपूज्य महंत गुरुवर्य ह.भ.प. भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालू झालेले संस्कार संस्कृती व स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराला श्री क्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी ह. भ. प. स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज यांनी भेट दिली. व शिबिरातील नवदुर्गांना प्रवचन रुपी उत्स्फूर्त मार्गदर्शन त्यामध्ये स्त्री म्हणजे माता दुर्गेचे रूप आणि या नवदुर्गांना घडवण्याचे काम करणाऱ्या सौदामिनी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे महाराजांनी तोंड भरून कौतुक केले. व आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये संस्कार व व संस्कृती किती महत्त्वाची आहे याचे महत्त्व शिबिरातील मुलींना समजावून सांगितले.

स्वामीजींनी शिबिरातील शिबिरार्थींना आशीर्वचन देतानी म्हणाले की आजच्या काळात संस्कृतीची जोपासना करण्यासाठी संस्कारांची फार गरज झाली आहे तसेच सध्या समाजात सुरू असलेल्या घातकी प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी आणि आपला धर्म संस्कार आणि संस्कृती टिकवण्यासाठी अशा फार आवश्यकता निर्माण झाली आहे.


महाराजांनी सर्व शिबिरार्थींना मोलाचे मार्गदर्शन केले आणि शिबिराचे महत्त्व पटवून दिले. याप्रसंगी वर्गाच्या वर्गाधिकारी चारुता ताई करूडकर, वर्गाचे पालक श्री जयप्रकाश जी खोत,कविताताई श्रोत्रीय, स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा अमृताताई नळकांडे, सचिव कृपा श्रोत्रीय, श्रीकांत नळकांडे, प्रशांत बहिराट, आदिनाथ पटारे तसेच वर्गाच्या शिक्षिका रोहिणी ताई टोळ, भार्गवीताई मापारी,ऋतुजा परदेशी ,वेदश्री निकम ,गायत्री निकम ,श्रुती मिटकरी ,राजलक्ष्मी गवळीउपस्थित होत्या.

याप्रसंगी स्वामी प्रकाशनंद गिरीजी महाराज बोलतानी म्हणाले की या वयामध्ये कराटे, लाठी काठी, यष्टी खेळ, तलवारबाजी, भालाफेक, रायफलबाजी, योगासन, ध्यानधारणा व विविध बौद्धिक सत्र, अंतराळ विज्ञान ,जंगल सफारी ,सामान्य ज्ञान, चरित्र अभ्यास, मनोरंजन, रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा, व विविध मान्यवरांचे मार्गदर्शन याप्रसंगी आपल्या तालुक्यातील 13 ते 25 वयोगटातील मुलींनी आपल्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा वेळ व्यर्थ न घालता या संस्कार शिबिराचा लाभ घेऊन सत्कारणी लावत आहे व त्यातून पुढील भविष्यासाठी शिकवण घेत आहे याचा मनस्वी आनंद स्वामी प्रकाश नंदगिरी महाराज यांनी बोलताना व्यक्त केला .याप्रसंगी शिवाजी पाठक ,गणेश जामदार अमित देवकर अजय परदेशी अमित मापारी व सर्व प्रतिष्ठानचे सदस्य यांनी सर्वांनी मिळून स्वामीचे संत पूजन केले.

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
26.4 ° C
26.4 °
26.4 °
82 %
3.8kmh
100 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
30 °
Thu
28 °

Most Popular

error: Content is protected !!