सोनई (प्रतिनिधी) – राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी शनिवारी सायंकाळी सहकुटुंब शनिशिंगणापूर येथे भेट देत उदासी महाराज अभिषेक केला आणि शनी चौथऱ्यावर जाऊन शनिदेवाचे दर्शन घेतले. या प्रसंगी देवस्थानच्या अतिथीगृहात नेवासाचे आमदार व शिवसेना शिंदे गटाचे नेते विठ्ठलराव लंघे यांनी त्यांचा सत्कार केला.
या वेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन देसर्डा, शनिशिंगणापूरचे पोलीस पाटील अॅड. सयाराम बानकर, मराठा महासंघाचे राज्य प्रमुख संभाजी दहातोंडे, हिरालाल जाधव आदी मान्यवरांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री शिरसाठ यांनी देवस्थान परिसराची प्रगती व राबविल्या जाणाऱ्या विविध योजना यांची माहिती घेत समाधान व्यक्त केले. देवस्थानच्या सामाजिक उपक्रमांची माहिती अॅड. सयाराम बानकर यांनी त्यांना दिली.