spot_img
spot_img
HomeUncategorizedसोनईत तिसऱ्या दिवशीही दिवसभर पावसाची जोरदार हजेरी

सोनईत तिसऱ्या दिवशीही दिवसभर पावसाची जोरदार हजेरी

आठवडा बाजारकरूनची दाणादाण. बाजार तळाला तळ्याचे स्वरूप

सोनई *विजय खंडागळे याज कडून*

सोनई शहरासह परिसरातील शिरेगाव, शनिशिगणापूर, खेडलेपरमानंद,मुळा कारखाना,बेल्हेकर वाडी,धनगर वाडी, पांनसवाडी, कागोणी,हिंगोनी,लांडेवाडी, या वाड्यांना तिसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली.त्या

सलग होत असलेल्या पावसाने ठिकठिकाणी खड्यानी पाणी साचून पाण्याचे डबके झालेले होते.येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे नागरिकाच्या अंगावर पाणी उडत होते.काही ठिकाणी गावात नाल्या तुडुंब भरल्या होत्या गावामध्ये काँक्रिट रस्ते झाले खरे, पण पाणी जाण्यासाठी काहीही पर्याय नाही त्यामुळे अनेक नागरिकाच्या घरासमोरच आणि बाजारपेठेत दुकानासमोर पाण्याचे डबके निर्माण झाले.

ढगाच्या गडगडसाह दमदार सरी पडतच होत्या. दिवसभर ढगाळ वातावरण होते.तीन दिवसापासून पाऊस सुरू आहे..या भागात पाऊस पडल्याने बाजरी, भूईमुग,कांदा,याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.दरम्यान रविवार आठवड्याचा बाजार फज्जा उडाला. बाजार करू दुकानदारांची आणि शेतीमाल विकायला आणलेल्या शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली

Newasa Darshan
Newasa Darshan
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
clear sky
32.5 ° C
32.5 °
32.5 °
47 %
7.3kmh
0 %
Mon
32 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
42 °

Most Popular

error: Content is protected !!