spot_img
spot_img
HomeUncategorized"हरिनामाच्या गजरात नेवासा उजळलं, माऊलीच्या पैस खांबाला लाखांनी वंदिलं!"

“हरिनामाच्या गजरात नेवासा उजळलं, माऊलीच्या पैस खांबाला लाखांनी वंदिलं!”

कामिका वद्य एकादशीच्या यात्रेनिमित्त शेकडो दिंड्यानी जमलेल्या लाखो वारकऱ्यांनी व वैष्णवांच्या मांदियाळीने नेवासा येथे  माऊलींच्या “पैस” खांबाचे  दर्शन घेतल 

कमीका एकादशीची धाकटी एकादशी अथवा ज्ञानेश्वरांची एकादशी म्हणून मानली जाते त्यामुळे संत ज्ञानेश्वर माऊलींची कर्मभूमी व  ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासा येथे मोठी यात्रा भरते पंढरपूर आषाढी वरुन आलेले वारकरी आपली वारी पूर्ण करण्यासाठी नेवाशाला येतात व माऊली चरणी नतमस्तक होतात यावर्षी गावागावावरून येणाऱ्या दिंड्यांच्या संख्येमध्ये मोठी वाढ झालेली दिसते त्यामुळे दुपारी 10 नंतर शेकडो दिंड्या हरिनामाचा गजर करीत नेवासा तीर्थक्षेत्री उत्साह मध्ये दाखल होत होत्या

   एकादशीच्या निमित्ताने पहाटे 3 च्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त देविदास म्हस्के यांचे उपस्थितीत पैठणचे संत एकनाथ महाराजांचे तेरावे वंशज डॉक्टर मेघशाम गोसावी व त्यांचे पुत्र श्री व सौ ज्ञानराज गोसावी तसेच ज्ञानेश्वर मंदिराचे चे विश्वस्त श्री व सौ कैलास व प्रतिभा जाधव यांच्या हस्ते माऊलींचे ” पैस” खांबास सपत्नीक अभिषेक करण्यात आला  यावेळी पौरोहित्य उमेश गुरु कुलकर्णी यांनी केले. पहाटे तीनच्या आरतीला मंदिराच्या गाभाऱ्यात  व आवारात हजार पेक्षा जास्त भावीक उपस्थित होते

 दर्शनासाठी पहाटे पासूनच तीर्थक्षेत्र नेवासानगरीत भाविकांची गर्दी झाली होती. जास्त गर्दी होईल या धास्तीने  सूर्योदया आधीच पहाटेच सुमारे वीस ते पंचवीस हजार भाविकांनी दर्शन घेतले सकाळी साडेतीन पासून बारी मध्ये रांगा लागलेल्या साडेचारला अभिषेक व आरती झाल्यानंतर बारी सुरू करण्यात आली

    एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणाच्या बाहेर आलेल्या दिंड्यांचे रिंगण सोहळे होत होते ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या रथाचे देखील भाविक दर्शन करीत होती ज्ञानेश्वर माऊली पंढरीनाथाच्या जयघोषाने परिसर दुमदुमला असताना दर्शनबारी रांगेसह मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दर्शन बारी रांग दिसत होती. मंदिरे पासून ज्ञानोदय हायस्कूल पर्यंत  विविध दुकाने सजली होती

विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग व सर्व विश्वस्त मंडळ आज दिवसभर भाविकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते

मंदिर प्रांगणात  पंचगंगा सिड्स कंपनीचे  प्रभाकर शिंदे व आमदार शंकरराव गडाख मित्र मंडळयांच्या वतीने आलेल्या भाविकांसाठी  शाबुदाना  खिचडी प्रसादाचे वाटप यावेळी करण्यात आले.मंदिराकडे येणाऱ्या वाटेवर रविराज तलवार,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील पतसंस्थेसह सर्व सुवर्णकार समाजाच्या वतीने संत नरहरी महाराज मंदिरात ही भाविकांनी मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. नागेबाबा पतसंस्थेच्या वतीने पावन गणपती समोर दिवसभर खिचडी वाटप चालू होते मोहिनीराज मंदिराजवळ ब्राह्मण संघटनेचे वतीने दिवसभर चहा आणि उकडलेले शेंगदाणे चे वाटप चालू होते याशिवाय विविध संस्था व मंडळाचे वतीने ,केळी,उपवासाचे पदार्थ ,पाणी बाटल्या पाणी पाऊच, दूध ,चहा याचा लंगर रात्री सात पर्यंत चालू होता

       देवगड दत्त मंदिर संस्थानचे  भास्करगिरीजी यांनी एक दिवस आधीच माऊलींच्या पैस खांबाचे  दर्शन घेतले आज देवगडचे उत्तर अधिकारी प्रकाशनंद गिरी स्वामी अहिल्या नगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री व पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे यांनी माऊलीचे दर्शन घेतले त्यावेळी त्यांचे बरोबर आमदार विठ्ठलराव लंघे, जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर सचिन देसरडा संभाजी दहातोंडे शिवसेनेचे बाळासाहेब पवार आदी मान्यवर हजर होते तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील दर्शन घेतले

    नेवासा शहरात येणाऱ्या माऊली भक्तांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार तर पोलीस दलाच्या वतीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात  बंदोबस्त ठेवण्यात आला

चौकट:- 600 पोते साबुदाणा खिचडी 700 लिटर दूध 50 कॅरेट केळी 19 पोते उकडलेले शेंगदाणे दोन पोते राजगिरा लाडू ,शेकडो लिटर चहा आणि शेकडो पाण्याची जार चे भाविकांना मोफत वाटप वाटप –

— ज्ञानेश्वरी दिंडीच्या अनोख्या सोहळ्याचे हे पहिलेच वर्ष असल्याने दिंडीतील सामील 27 दिंड्यांचे वारकरी वाढल्याने यावेळी नेहमीपेक्षा  आषाढी वद्य कामिका एकादशीच्या निमित्ताने विक्रमी गर्दी झाली होती 

इतिहासात प्रथम निघालेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी पालखी सोहळ्याला शासकीय नामांकनाचे यादीत स्थान देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांनी दिले कामिका एकादशी निमित्त ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले असताना त्यांनी ज्ञानेश्वर मंदिर विकास  आराखडा प्रकल्प पूर्ण करण्याचे भाग्य मला लागणार आहे असे सांगून नगर जिल्ह्यातील निळोबारायांच्या मानाच्या पालखी प्रमाणेच नेवासाच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी दिंडी पालखी सोहळाला शासकीय मान मिळावा यासाठी शासकीय पद्धतीचा अभ्यास करून मान मिळवून देऊ असे आश्वासन दिले

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सोमनाथ घाडगे यांनी देखील कामिका एकादशी निमित्त येऊन ज्ञानेश्वरांचे पैस खांबाचे दर्शन घेतल

Newasa Darshan
Newasa Darshanhttps://newasadarshan.live/wp-admin/profile.php
*मी गुरुप्रसाद मधुकर देशपांडे ( डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर, बीए हिस्टरी बीए हिंदी आणि बॅचलर ऑफ जर्नालिझम)* वृत्तपत्रे विक्रेता आणि बातमीदार या क्षेत्रामध्ये गेले तीस वर्ष * दैनिक लोकसत्ता दैनिक केसरी आणि दैनिक दिव्य मराठी* या वृत्तपत्रांच्या माध्यमातून कार्यरत
RELATED ARTICLES
Jalgaon
overcast clouds
24.6 ° C
24.6 °
24.6 °
88 %
3.6kmh
100 %
Sun
26 °
Mon
28 °
Tue
27 °
Wed
29 °
Thu
29 °

Most Popular

error: Content is protected !!