नेवासा){ सुधीर चव्हाण यास कडून }नेवासा तालुक्यातील गोणेगाव येथे वैकुंठवाशी हभप श्री रामकृष्ण महाराज काळे गुरुजींनी स्थापित केलेल्या श्री विठ्ठल रुख्मिणी अध्यात्मिक केंद्र संचलित रामकृष्णा श्रमात पंधरा दिवशीय मृदुंग बालसंस्कार शिबिर व त्रिदिनी किर्तन महोत्सवास गुरुवारी दि.१५ मे पासून प्रारंभ करण्यात आला.दि.१५ मे २९ मे या कालावधीत सदरचा सोहळा साजरा होत आहे. रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख महंत वेदमूर्ती हभप भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या हस्ते धर्म ध्वज पूजनाने व पुंडलिक वरदे ..हरि विठ्ठलच्या जयघोषाने सोहळयाचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला
वैकुंठवाशी हभप श्री रामकृष्ण महाराज काळे गुरुजी यांच्या पुण्यतिथी रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हा सोहळा साजरा होत आहे. रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख महंत हभप भगवान महाराज जंगले शास्त्री यांच्या प्रेरणेने व हभप आळंदी येथील मृदुंग महर्षी हभप सुखद महाराज जाधव व हभप निलेश महाराज रोडे यांच्या नेतृत्वाखाली मृदुंग बालसंस्कार शिबिर सुरू झाले आहे.या शिबिरामध्येमृदुंगासह इतर ज्ञानदान नामवंत महाराज मंडळी उपस्थित राहून करणार आहे.
यानिमित्ताने दि.२७ मे दि.२८ मे व दि.२९ मे या तीन दिवसाच्या कालावधीत त्रिदिनी किर्तन महोत्सव साजरा होत असून या किर्तन महोत्सवात सकाळी ९ ते ११ या वेळेत किर्तन सोहळे साजरे होणार आहे यामध्ये दि.२७ मे रोजी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य हभप देविदासजी महाराज म्हस्के,दि.२८ मे रोजी गोंधवणी येथील श्री ज्ञानाई वारकरी शिक्षक संस्थेचे प्रमुख हभप ऋषिकेश महाराज वाकचौरे यांच्या कीर्तनानंतर सायंकाळी ५ ते ७ यावेळेत पुणे येथील प्रसिद्ध गायक पंडित यादवराज जी फड यांच्या भक्ती स्वर गंध भक्ती संगीताचा कार्यक्रम होणार आहे
गुरूवार दि.२९ मे रोजी आळंदी येथील सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक हभप ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांच्या होणाऱ्या काल्याच्या किर्तनाने पंधरा दिवशीय मृदुंग बालसंस्कार शिबिराची व त्रिदिनी किर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.रामकृष्ण महाराज काळे गुरुजींच्या रौप्य महोत्सवी पुण्यतिथी सोहळयाच्या निमित्त होणाऱ्या त्रिदिनी किर्तन महोत्सवाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख महंत हभप भगवान महाराज जंगले शास्त्री यांनी केले आहे