नेवासे
३५च्या घरातच थांबला! पण पास झाला, सगळ्या शिक्षकांना आणि पालकांना टेंशनमध्ये टाकणारा रवी धनवटे अखेर हायस्कूल मधून आय टी आय ला जाणार
नेवासा तालुक्यातील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमध्ये गेली अनेक शिक्षकांना वाटत होतं की “हा रवी काहीतरी वेगळं करणार!” पण त्यांनी कल्पनाही केली नसेल की हा मुलगा सर्व विषयांत अगदी ३५ गुणांची ‘हातमिळवणी’ करूनच शाळेचा निरोप घेईल!
होय! रवी धनवटे या ‘समीकरणात अडकलेल्या’ विद्यार्थ्याने आपल्या दहावीच्या परीक्षेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल – कुठलाही विषय असो, त्याच्या उत्तरपत्रिकेत एक जादुई आकडा चमकत होता – ३५!
शिक्षकांना वाटलं, “हा कधीच पास होणार नाही,” पण रवीने ठरवलं होतं – “नाही रे बाबा, पास तर होणारच! पण जास्त नाही. फक्त जेवढं लागतं तेवढंच!”
त्यानं अभ्यास केला की नाही हे अजूनही संशोधनाचा विषय आहे, पण रिझल्ट पाहून सर्वांना आनंदाचाच नाही तर आश्चर्याचा धक्का बसला
रवी च्या घरी आई-वडील भाऊ बहीण आहेत त्याचे वडील मजुरी करतात तर भाऊ पेंटर म्हणून काम करतो घरी आणि संभाजीनगर मोहल्यात तसेच शाळेमध्ये देखील त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे
एकूणच रवीने शिक्षण क्षेत्रात ‘काठावर पास होण्याची कलासाधना’ कशी असते, याचा एक जिवंत नमुना सादर केला आहे.